महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतात ठेवलेले धानाचे ढीग जाळले, शेतकऱ्यांचे नुकसान

शेतात कापून ठेवलेले धानाच पुजने जाळल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. याची भरपाई मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

gondia
धानाचे पुजने

By

Published : Dec 7, 2019, 10:21 AM IST

गोंदिया - शेतात कापणी करुन ठेवललेले धानाचे पुजने (ढीग) जाळण्याचा प्रकार जिल्ह्यात काही दिवसांपासून होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पेरणीला केलेला खर्च परत न आल्याने कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो, अशी भीतीही शेतकरी उपस्थित करत आहेत.

धानाचे पुजने जाळले गेले

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील कोटजांभोंरा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान कापून त्यांचे पुजने मांडणी करुन ठेवले होते. मात्र, कुण्या अज्ञात व्यक्तीने हे धानाचे पुजने जाळले. अशाच प्रकारची घटना मागे सुद्धा घडल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. याची तक्रार पोलिसात दिली गेली. पण, पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले नाही.

हेही वाचा -गोंदिया: राज्य परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक सहलीसाठी प्रवासदरात ५० टक्क्यांची सूट

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २० हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते. पण, एकाही शेतकऱ्याला ही मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर याचा शोध घ्यावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details