नकली दारू तयार करणा-या कारखान्यावर गुन्हे शाखेची धाड, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
हलबीटोला येथील अशोक हुपराम गि-हेपुंजे या शेतक-याच्या शेतात बनावट दारू करून त्याचा पुरवठा जिल्ह्याभरात करणा-या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत सहा लाख ७४ हजार ७१० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
गोंदिया:- हलबीटोला येथील अशोक हुपराम गि-हेपुंजे या शेतक-याच्या शेतात बनावट दारू करून त्याचा पुरवठा जिल्ह्याभरात करणा-या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत सहा लाख ७४ हजार ७१० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हलबीटोला येथील बनावट दारूच्या कारखान्यावर धाड टाकली. दारू बनविण्याचा कोणताही परवाना नसताना दारू तयार केली जात होती. या मध्ये आरोपी हेमंत बन्सीलाल पज्ञाकर रा. गोरेगाव याने हलबीटोला येथील शेतशिवारातील अशोक हुपराम गि-हेपुंजे रा. महावीर कॉलोनी, गोरेगाव यांच्या मालकीचे घर करार तत्वावर घेउन त्याचा वापर बनावट देशी - विदेशी दारू कारखान्यासाठी करीत होता. या कामासाठी आरोपी कामगार हनीफ रमजान शेख, मेहताब नादरखॉ पठाण, नजीर इसराईल सय्यद सर्व रा. कु-हाडी हे अवैध दारू गाळत होते. ती दारू देशी - विदेशी दारूच्या बाटल्यात भरून लोकांना सेवन करण्यासाठी पॅकिंग करून ठेवलेली होती.