गोंदिया - राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दोन लाख २१ हजारांची देशी दारू पकडण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार बाजपाई वॉर्ड येथे धर्मकाटाच्या बाजूला असलेल्या चारचाकीत बनावटी देशी दारू आढळली. याची किंमत दोन लाख २१ हजार रुपये असून या मुद्देमालासह पोलिसांनी चारचाकी जप्त केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दोन लाख २१ हजारांची देशी दारू पकडण्यात आली आहे. हेही वाचा -नाशकात तरुणावर शस्त्राने वार, मग केली दगडाने ठेचून हत्या
गाडीसह सर्व मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयीन आवारात ठेवला होता. मात्र मध्यरात्री अज्ञातांनी या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. याबाबत गोंदिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.