महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनेक महिन्यांपासून घंटागाड्या बंद; संतप्त नगरसेवकांनी फेकला नगराध्यक्षांच्या दालनात कचरा

गोंदिया नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. मात्र, ही नगर परिषद भोंगळ कारभारामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहत आहे. मागील अनेक महिन्यांपासून शहरात कचरा उचण्यासाठी कचरा गाडी आणि घंटागाड्या फिरत नाहीत. यामुळे शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. शहरातील कचरा उचण्याची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे.

gondia nagar parishad, gondia
गोंदिया नगर परिषद

By

Published : Jan 10, 2020, 8:28 AM IST

गोंदिया - येथील नगर परिषद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मागील अनेक महिन्यांपासून शहरात कचरा उचलण्यासाठी कचरा गाडी आणि घंटागाड्याच येत नाहीत. यामुळे संतप्त नगरसेवकांनी आपल्या वॉर्डातील कचरा आणला. एवढेच नव्हे तर नगराध्यक्ष यांच्या दालनातच कचरा टाकला. यावेळी नगरसेवक आणि अध्यक्ष यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. यावेळी बराच गोंधळ उडाला होता.

गोंदिया नगरपरिषदेतील प्रकार

गोंदिया नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. मात्र, ही नगर परिषद भोंगळ कारभारामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहत आहे. मागील अनेक महिन्यांपासून शहरात कचरा उचण्यासाठी कचरा गाडी आणि घंटागाड्या फिरत नाहीत. यामुळे शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. शहरातील कचरा उचण्याची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे. मात्र, नगर परिषदेच्या कारभारामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याबाबत नगर सेवकांनी अध्यक्षांकडे अनेकदा तक्रारी केली. मात्र, यानंतरही त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली. मुख्य म्हणजे नगर परिषदेकडे गाड्यांमध्ये डिझेल भरायला पैसे नसल्यामुळे शहरात कचरा गाडी आणि घंटागाड्या फिरत नाहीत. त्यामुळे शहरात जिकडे-तिकडे कचराच कचरा दिसून येतो. मात्र, याकडे नगरपरिषदेला लक्ष द्यायला तयार नाही.

हेही वाचा -महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना घोषित रक्कम मिळाली नाही, काका पवारांच्या गौप्यस्फोट

तर, दिवाळीपासून परिषदेचे मुख्य अधिकारी नसल्याने शहरातील अनेक कामे खोळंबली आहेत. शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले असल्याने संतप्त नगरसेवकांनी गुरूवारी चक्क शहरातील कचरा गोळा केला. नंतर हा कचरा नगर परिषदेत आणि नगराध्यक्ष यांच्या दालनात फेकण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details