गोंदिया - गोंदियातही तीन केंद्रावर कोरोना लसीकरणाचे ड्राय रन घेण्यात आले. बाई गंगाबाई महिला रुग्णालय, रजेगाव ग्रामीण रुग्णालय व खमारी प्राथमिक आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी ड्राय रन घेण्यात आले आहे. कोरोना लस आल्यानंतर ती शीतकरण केंद्रापासून ते लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पोहोचवण्यापासून ते लस देण्यापर्यंतची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आरोग्य संचालकाडून बुधवारी ऑनलाईन ट्रेनींग देण्यात आले. त्यानंतर या संपूर्ण तयारीची रंगीत तालीम घेण्यात आली.
लसीकरणादरम्यान केंद्रावर असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर सकाळी 10 वाजेपासून या ड्रायरनला सुरवात करण्यात आली. या वेळी तिन्ही सेंटरवर 25 - 25 लोकांना या कोरोना लसीचे ड्राय रनसाठी निवडण्यात आले होते. या तिन्ही केंद्रावर जिल्हा अधिकारी दीपक मीना व उपजिल्हा अधिकारी यांनी पाहणी करत आढावा घेतला आहे.
गोंदियात तीन केंद्रांवर कोरोना लसीकरण पाच तज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित
आपत्काली परिस्थितीत लसीकरण करण्यासाठी भारत निर्मित कोविडच्या दोन लसींना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, मात्र लसीकरणा दरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पूर्वतयारीचा ड्राय रन घेतला जात आहे. गोंदियात ड्रायरनला सकाळी 10 वाजेपासून सुरुवात करण्यात आली या वेळी तीन केंद्रावर या लसीचे ड्राय रन सुरु करण्यात आले असून 75 लोकांना हे ड्राय रन दिले जात आहे.
लसीकरणादरम्यान लस घेणाऱ्याला कुठलीही रिअॅक्शन झाल्यास त्यावर त्वरित उपचार करता यावा, यासाठी प्रत्येक केंद्रावर पाच तज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित आहे. त्याच प्रमाणे लस देणारे वैद्यकीय अधिकारी, निरीक्षक ऑक्सिजन देणारे पथक, आरोग्य सेविका व तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.
हेही वाचा -IND vs AUS, 3rd Test: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांत आटोपला, जाडेजाचा प्रभावी मारा