गोंदिया- कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आणि राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद केली गेली. तब्बल आठ महिन्यांनी राज्य सरकारने शाळा उघडण्यास हिरवा कंदील दिला. त्या अनुषंगाने २३ नोव्हेंबरपासून शाळा महाविद्यालये सुरू करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातदेखील शाळा सुरू झाल्या. मात्र, नक्षलग्रस्त असलेल्या देवरी तालुक्यात एकमेव जिल्हा परिषदेची शाळा ककोडी गावात आहे. ती शाळा उघडली परंतु शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवलेच नाही.
शिक्षकांचे कोरोना अहवाल प्रलंबित -
या शाळेतील शिक्षकांचे कोरोना चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी न शिकवण्याचा निर्णय घेतला. शिक्षक आणि विद्यार्थी शाळेत होते पण विद्यार्थ्यांना शिकवले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. तर, दुसरीकडे तीन दिवस उलटूनही चाचणीचा अहवाल न आल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. अहवाल लवकर आल्यास आम्ही विद्यार्थ्यांना शिकवू शकू, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.
शाळा उघडण्याआधीच शिक्षकांची चाचणी घ्यायली हवी होती -
शासनाने शाळा उघडण्याआधीच शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करायला हव्या होत्या, असे विद्यार्थी म्हणाले. देवरी भागात नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हते. त्यामुळे शाळा सुरू झाल्याने आतातरी शिकता येईल, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात होती. मात्र, शाळेत येऊनही शिक्षकांनी न शिकवल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
या जिल्ह्यांमध्ये उघडल्या शाळा -