महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कोरोनाचा प्रवेश, ५० पेक्षा जास्त कर्मचारी क्वारंटाईन - gondiya corona update news

फुलचुर नाक्या येथे असलेल्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका अधिकाऱ्यांसह प्रतिनिधी कोरोनाबाधित आढळून आले होते. यामध्ये प्रतिनिधींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या मुळे उप्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे आदेश प्राप्त होताच सादर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले.

corona positive patient found in various government offices in gondiya
corona positive patient found in various government offices in gondiya

By

Published : Aug 18, 2020, 6:58 PM IST

गोंदिया -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने वाढत आहे. कोरोनाने आता शासकीय कार्यालयात शिरकाव केला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका लिपिकाला कोरोना झाला आहे. त्याच्या सानिध्यातील 40 लिपिक व इतर कर्मचाऱ्यांना कारंजा येथील पोलीस मुख्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

फुलचुर नाक्या येथे असलेल्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका अधिकाऱ्यांसह प्रतिनिधी कोरोनाबाधित आढळून आले होते. यामध्ये प्रतिनिधींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे आदेश प्राप्त होताच सादर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले. या कारणाने १५ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत कार्यालय बंद करण्यात आले. त्याचप्रमाणे देवारी येथील दिवाणी न्यायालयात कार्यलयात कर्मचारी सुद्धा कोरोनाबाधित आढळून आल्याने हे न्यायालय १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आले. परंतु अतिआवश्यक कामकाज सडक-अर्जुनी दिवाणी न्यायालयात होणार असल्याचे ही सूचित करण्यात आले.

गोरेगाव पोलीस ठाण्यात एका अधिकाऱ्यासह ६ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले. तसेच नवेगावबांध पोलीस ठाण्यातही अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्डही कोरोनाबाधित झाले आहेत. तर, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८२२ वर गेली असूनसुद्धा 233 क्रियाशील आहे. तर कोरोनाने जिल्ह्यात आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे 547 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून घरी परतले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details