गोंदिया - जिल्ह्यात कोरोनाचे पुन्हा आगमन झाले आहे. तब्बल 10 दिवसांनी एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला. गोंदियाच्या प्रयोगशाळेतील तपासणी केंद्रातून 12 जूनला प्राप्त चाचणी अहवालावरून हा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. हा रुग्ण 20 ते 30 वर्ष वयोगटातील असून तो तिरोडा तालुक्यातील आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत जे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यापैकी 26 मार्चला एक 19 मे रोजी दोन, 21 मे रोजी27, 22 मे रोजी 10, 24 मे रोजी 4, 25 मे रोजी 4, 26 मे रोजी एक, 27 मे रोजी एक, 28 मे रोजी 9, 29 मे रोजी तीन, 30 मे रोजी चार, 31 मे रोजी एक, 2 जूनला दोन आणि शुक्रवारी 12 जूनला एक असे एकूण 70 कोरोनाबाधित आढळून आले .
2 जून ते 11 जून या नऊ दिवसाच्या कालावधीत नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र दहाव्या दिवशी पुन्हा एक रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्हयात पुन्हा कोरोनाबाधित व्यक्तीची भर पडली आहे.