गोंदिया- सडक अर्जुनी तालुक्यात पोलीस पाटलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन पाहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंसह इतर मान्यवरांनी हजेरी लावली. सोबतच पूर्व विदर्भातील शेकडो पोलीस पाटील या अधिवेशनाला आले होते. पोलीस पाटलांच्या समस्या व मागण्यांची या अधिवेशनादरम्यान मांडण्यात आल्या.
गोंदियात पहिल्यांदाच पोलीस पाटलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन - Gondia news
यावेळी पोलीस पाटलांना आश्वासन देत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्याच्या तिजोरीत किती पैसे शिल्लक आहेत, हे तपासून पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करू.
यावेळी पोलीस पाटलांना आश्वासन देत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्याच्या तिजोरीत किती पैसे शिल्लक आहेत. हे तपासून पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करू. त्याआधी मागील सरकारने 6 हजार 500 रुपये घोषित केले होते. मात्र, तेही दिले नाहीत. त्यामुळे आधी 6 हजार 500 रुपये मानधन सुरळीत कसे देता येईल? या संदर्भात पाठपुरावा करू, असे गृहमंत्री म्हणाले.
तर पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महत्वाचा दुवा असून याच्या समस्या लवकरच मुंबईत बैठक घेऊन सोडवू, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस पाटलांना दिले.