महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या नियोजनबद्ध कटाचा भाग - पंतप्रधान मोदी - modi in gondia

काँग्रेसने 'हम निभाएंगे' असा वादा करत जाहीरनामा जाहीर केला. यात ५ महत्वाच्या मुद्यांचा समावेश केला असून न्याय, रोजगार, शेतकरी हे मुद्दे केंद्रस्थानी आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Apr 4, 2019, 2:42 AM IST

गोंदिया - पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील दुसरी प्रचारसभा गोंदियात पार पडली. येथे मोदींनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. या वेळी, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या नियोजनबद्ध कटाचा दस्तऐवज असल्याची घणाघाती आरोप मोदींनी केला.


मंगळवारी काँग्रेसने मांडलेला जाहीरनामा म्हणजे त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा करण्याचा कट रचला आहे, याचाच पुरावा देतो. हा पाकिस्तानच्या नियोजनबद्ध कटाचा दस्तऐवज आहे. यामुळे सैन्याचे मनोबल खचेल, असा आरोप मोदींनी केला. तसेच, काँग्रेस देशाची दिशाभूल करत असल्याची टीकाही त्यांनी केली. 'तुम्हाला सर्जिकल स्ट्राईक लक्षात आहे ना? कशा पद्धतीने शत्रूच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करण्यात आला? काही लोक एसी खोल्यांमध्ये बसून देश बालाकोटला काय घडले, ते विसरत आहेत, असे म्हणतात. आमच्यासाठी नेहमीच देश प्रथम आणि पक्ष नंतर आहे. मात्र, या देशातील धोरण अनेक दशके उलट्या पद्धतीने जात राहिले आहे. येथे दहशतवाद्यांना वाचवले जात होते,' असेही ते म्हणाले.


'काँग्रेसचे भेसळीचे सरकार आले नाही, तर देशातील माओवाद संपविण्यात यश येईल,' असा दावा मोदींनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी सहमत आहेत का, हे त्यांनी सांगावे असे आवाहनही केले आहे. तसेच, शरद पवार शांत का बसले आहेत? असा सवालही त्यांनी केला. सुरक्षादलांना दुर्बळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसशी सहमत आहे का, हे त्यांनी सांगावे, असे मोदी म्हणाले.


काँग्रेसने 'हम निभाएंगे' असा वादा करत जाहीरनामा जाहीर केला. यात ५ महत्वाच्या मुद्यांचा समावेश केला असून न्याय, रोजगार, शेतकरी हे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. राजद्रोहाचा गुन्हा ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम १२४ अ रद्द करण्यात येईल, असे वचन काँग्रेसने दिले आहे. तसेच, अफ्सा कायद्यासंदर्भातही काँग्रेसने आश्वासन दिले आहेत. यावर भाजपने जोरदार हल्ला चधवला आहे. जाहीरनाम्यातील भाषा ही देश तोडणारी असल्याची टीकाही मंगळवारी अरूण जेटली यांनी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details