गोंदिया- जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत येत असलेल्या कावरबांध गावातील कुंबिटोला येथील 11 वर्षीय मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. क्रिस गणेश मच्छीर्क, असे मृत मुलाचे नाव आहे.
ळ्यात पोहायला गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. आज (शनिवारी) दुपारी कुंबिटोला येथील तळ्यात कावरबांध येथील 5 लहान मुले पोहण्याकरीता गेली होती. यावेळी या पाच मुलांमधून क्रिस गणेश मच्छीर्क या मुलाने पोहायला तळ्यात उडी मारली. मात्र नंतर तो वर आलाच नाही. त्यामुळे सोबत असणाऱ्या मुलांनी आरडा ओरड करत गावकऱ्यांना क्रिस पाण्यात बुडाल्याची माहिती दिली. त्यानंतर गावातील लोकांनी तळ्यात शोध घेतला. काही वेळाने क्रिसला तळ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - आमदार अग्रवाल यांच्यावर शिवीगाळ करणाऱ्या नगर परिषदेच्या उपाध्यक्षाला अटक
आज शनिवार असल्याने सकाळ पाळीची शाळा होती. त्यामुळे मुले शाळेतून ११ ते १२ च्या दरम्यान शाळेतून घरी आले व दुपारी २ ते ३ च्या दरम्यात गावातील तळ्यात पोहण्यासाठी गेले. या पाच मुलांपैकी क्रिसने पोहण्यासाठी पहिली उडी मारली. मात्र, ज्या ठिकाणी क्रिसने उडी मारली त्या ठिकाणी पाणी अधिक होते. त्यामुळे क्रिस बाहेर आलाच नाही व त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता सालेकसा येथील रुग्णालयात नेण्यात आला.
हेही वाचा - आमदार परिणय फुकेंनी लोकार्पण केलेले तहसील कार्याल १० दिवसानंतरही बंदच!