गोंदिया : जिल्ह्यात झालेल्या महापुरामुळे अनेकांची घरे पडली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज (रविवार) जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यांनी गोंदिया तालुक्यातील अनेक गावांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच, नुकसानभरपाईचे आश्वासन दिले.
जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी महापूर आला असून या पुरामुळे अनेक गावे, शेती पुराच्या पाण्यात वेढली गेली होती. त्यामुळे अनेक घरे, गोठे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने गोंदिया तालुक्यातील जिरुटोला, बिरसोल, कासा, पुजारीटोला, ब्राम्हणटोला, या गावांमध्ये पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. उद्या नागपूर येथे आयुक्तांसोबत बैठक होणार आहे. नुकसानभरपाई लवकरात लवकरत देण्यात येणार असल्याचे केंद्रीय पथकमध्ये आलेले डॉ. आर. पी. सिंग यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.