गोंदिया - शहरात क्षुल्लक कारणावरून दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या हत्येच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांतर्फे कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.
हत्येच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांतर्फे कँडल मार्च काढण्यात आला. शहरातील मनोहर चौकात 9 नोहेंबरला 17 वर्षीय कान्हा शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती. याच मुलाच्या दोन मित्रांनी वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन हा खून केला होता.
हेही वाचा उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून मित्राचा खून
दिवसेंदिवस खालावत चाललेली कायदा व सुव्यवस्था तसेच अल्पवयीन तरुणांच्या हातून हत्येसारखे घडणारे मोठे गुन्हे, यावर पोलिसांनी नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दुर्गा चौकापासून सुरू झालेल्या या कँडल मार्चचा नेहरू चौकात समारोप करण्यात आला.
पूर्ववैमनस्यातून खून
मृत पावलेल्या कान्हा शर्माला वर्षभरापूर्वी एका दही हंडीच्या कार्यक्रमात नाचताना संबंधित आरोपींचा धक्का लागला होता. यावेळी त्याने या दोन्ही मित्रांना सर्वांसमोर कानशिलात लगावल्याने दोघांच्याही मनात शर्माबद्दल राग होता.
9 नोहेंबरच्या दिवशी संध्याकाळी कान्हा शर्मा मनोहर चौकात एकटा उभा असताना आरोपींनी कान्हावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. मृत कान्हा शर्मा व दोन्ही आरोपी एकाच वर्गात शिकत असून, उच्च शिक्षित तसेच उच्चभ्रू घरातील आहेत.