गोंदिया- महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन होऊन ८ दिवस झाले आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे, खाते वाटप कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. असे असले तरी येत्या एक-दोन दिवसात सरकारकडून खातेवाटप तसेच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्टीकरण राज्यसभा सदस्य एव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे.
एक-दोन दिवसात राज्य सरकारचे खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्तार - प्रफुल्ल पटेल - Ministry Extension Praful Patel gondia
प्रफुल्ल पटेल काल (८ डिसेंबर) गोंदिया येथील भंडारा व गोंदिया जिल्हा नागरिक सत्कार समारंभात आले होते. स्थानिक सुभाष शाळेच्या मैदानावर झालेल्या या समारंभात पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेसह नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला.
प्रफुल्ल पटेल काल (८ डिसेंबर) गोंदिया येथील भंडारा व गोंदिया जिल्हा नागरिक सत्कार समारंभात आले होते. स्थानिक सुभाष शाळेच्या मैदानावर झालेल्या या समारंभात पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेसह नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. मंत्रिमडळ विस्ताराबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्षात खाते वाटप होणार असल्यामुळे सहाजिकच या प्रक्रियेत थोडा वेळ लागेल, असे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-गोंदियात कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्या, ३ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता