महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ramdas Athawale On Raj Thackeray Role : राज ठाकरेंना समर्थन करणे भाजपला महागात पडेल - रामदास आठवले - मनसे भाजप युती फायदा

मनसेची भूमिका ही अतिहार्ड असून, ही हार्ड भूमिका घेऊन भाजपाला फायदा (MNS BJP Yuti Benefits) होणार नाही. त्यामुळे राज ठाकरे (BJP Support Raj Thackeray Role) यांचे समर्थन घेणे राजकीय पातळीवर भाजपाला महागात पडेल, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale on Raj Thackeray) यांनी केले आहे.

Ramdas Athawale
रामदास आठवले

By

Published : Apr 19, 2022, 7:07 PM IST

Updated : Apr 19, 2022, 7:39 PM IST

गोंदिया - मनसेची भूमिका ही अतिहार्ड असून, ही हार्ड भूमिका घेऊन भाजपाला फायदा (MNS BJP Yuti Benefits) होणार नाही. त्यामुळे राज ठाकरे (BJP Support Raj Thackeray Role) यांचे समर्थन घेणे राजकीय पातळीवर भाजपाला महागात पडेल, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale on Raj Thackeray) यांनी केले आहे. भाजप आणि मनसेची युती होऊच शकत नाही. रिपाई पक्ष भाजपसोबत असताना त्यांना मनसेची गरज नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले. बाबासाहेबांना मानणारा हा रिपाई पक्ष सोबत असताना भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

हेही वाचा -Ramdas Athawale on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत - मंत्री रामदास आठवले

रिपाई राज ठाकरे यांना समर्थन करत नाही -मशिदीवरील भोंगे हटवणे असंवैधानिक असून, राज ठाकरे यांची भाषा गुंडागिरीची असल्याचे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. ते गोंदियात एका कार्यक्रमात बोलत होते. आपला रिपाई पक्ष राज ठाकरे यांना समर्थन करत नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मंदिरात भोंगे लावा, मात्र मशिदीमधील भोंगे हटवणे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानाने सर्वाना सर्वधर्म समभावचा नारा दिला आहे. जर राज ठाकरे असेच संविधान विरोधी वक्तव्य करत दादागिरी करतील तर रिपाई आपल्या पद्धतीने उत्तर देइल, असा इशारा आठवले यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांना आतापर्यंत अयोध्या का आठवली नाही? -राज ठाकरे यांनी अयोध्याला खुशाल जावे. मात्र, त्यांना आतापर्यंत अयोध्या का आठवली नाही, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. मनसेने ख़ाली हात अयोध्याला जाऊ नये, राम मंदिर बांधण्यासाठी काहीतरी घेऊन जावे, असेही आठवले यावेळी म्हणाले.

हिंसा करणे चुकीचे- दिल्ली येथील हिंसाचारावर रामदास आठवले बोलत होते. हिंसा करणे चुकीचे असून, हिंसा कराल तर जेलमध्ये जाल, असे आठवले यावेळी म्हणाले. हिंसा करणाऱ्यांवर केंद्र सरकारने व राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे.

हेही वाचा -मशिदीवर भोंगे लावले म्हणून आम्ही देखील भोंगे लावू ही भूमिका योग्य नाही - रामदास आठवले

Last Updated : Apr 19, 2022, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details