गोंदिया - जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनात जिल्ह्यातील अशोक गायधने यांच्या वळूला पहिला क्रमांक पटकावला आहे. यावेळी गायधने यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक लाखाचा धनादेश देण्यात आला.
गोंदियाचा वळू देशात अव्वल; मुख्यमंत्र्याच्या हस्ते एक लाखाचे पारितोषिक - valu
जालन्यात झालेल्या राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनात देशभरातील जनावरांनी सहभाग घेतला होता. यावेळी उत्तम दर्जाचे वळू म्हणून गायधने यांच्या कृत्रिम प्रद्धतीने जन्माला आलेला वळूने प्रथम क्रमांक पटकावला.
![गोंदियाचा वळू देशात अव्वल; मुख्यमंत्र्याच्या हस्ते एक लाखाचे पारितोषिक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2522409-491-4892121f-7ad4-4b6d-8e18-06ea1a6abf50.jpg)
जालन्यात झालेल्या राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनात देशभरातील जनावरांनी सहभाग घेतला होता. यावेळी उत्तम दर्जाचे वळू म्हणून गायधने यांच्या कृत्रिम प्रद्धतीने जन्माला आलेला वळूने प्रथम क्रमांक पटकावला. चिचाळबांध येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेंद्र पटेल आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक यांच्या मार्गदर्शनात गायधने यांनी गवळावू कानडी न.जी - ६४९ ने गाय फळवली. यामध्ये हा पांढरा शुभ्र आणि उत्तम दर्जाचा वळू जन्माला आला. गायधने यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वळूची देखरेख केली आहे. आतापर्यंत या वळूने विदर्भ आणि जिल्हा पातळीवर दोन मोठी पारितोषिके पटकावली आहेत.