गोंदिया -आईने नवीन गाडी घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मोठ्या मुलाने आपल्या लहान मतिमंद भावाची गळा आवळून हत्या केली. ही घटना जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मौजे जवरी या गावात घडली. सकाळी 5 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भुवन डोळे (वय 19) असे मृत भावाचे नाव असून हेमंत डोये असे आरोपीचे नाव आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी हेही वाचा -विदेशी दारूचा कर ५० टक्के कमी केला मात्र विजेचे दर कमी न करता डीपीच काढून नेले - देवेंद्र फडणवीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवन लक्ष्मण डोये हा मुलगा मतिमंद होता. त्यामुळे, त्याच्या ओषधीसाठी खर्च होत असे. त्यातच हेमंत लक्ष्मण डोये याने आईला दुचाकी घेऊन देण्याची मागणी केली. मात्र, आईने लहान भावाला ओषधीसाठी पैसे लागत असतात. त्यामुळे, गाडी घेता येणार नाही, अशी अडचण सांगितली. मात्र, हेमंतने आईसोबत गाडी घेऊन देण्यासाठी भांडण केले. भांडणामुळे भीती पोटी हेमंतची आई शेजारच्या घरी झोपायला गेली. आरोपीने गाडी घेऊन देत नसल्याचा राग मनात ठेवून रात्री झोपलेल्या भुवन याची गळा आवळून हत्या केली. तसेच, या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीसुद्धा फिर्यादी आईला दिली. मात्र, तिने याची तक्रार पोलिसांना दिली आणि त्यावरून आमगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२, ५०६ भा.दं.वि अन्वेय गुन्हा नोंद केला असून आरोपी हेमंतला अटक केली आहे.
हेही वाचा -Chagan Bhujbal in Gondia : माझा राजीनामा घ्या - छगन भुजबळ