महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात खंडणीसाठी आतेभावाने केली अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची हत्या - ramnagar police gondia

मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय सौरभ कटारे या तरुणाची खंडणीसाठी त्याच्याच आतेभावाने मित्रांच्या मदतीने हत्या केली आहे. रामनगर पोलिसांनी २४ तासाच्या आत चार आरोपींना अटक केली आहे.

gondia news
गोंदिया मर्डर

By

Published : Dec 19, 2019, 12:10 PM IST

Updated : Dec 19, 2019, 2:57 PM IST

गोंदिया - मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याची खंडणीसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौरभ कटारे(२०) असे मृत मुलाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे खंडणीसाठी त्याच्याच आतेभावाने मित्रांच्या मदतीने ही हत्या केली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी २४ तासाच्या आत चार आरोपींना अटक केली आहे. अंकित बिरनावर असे त्या आरोपी आतेभावाचे नाव आहे.

गोंदियात खंडणीसाठी आतेभावाने केली अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची हत्या

हेही वाचा -रेस कोर्सजवळ पाईपलाईन फुटली; मुंबई सेंट्रल परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

सौरभ कटारे हा गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेत आहे. १५ डिसेंबरला तो घरून कॉलेजमध्ये जातो असे सांगून घरून निघाला. मात्र, रात्र होऊनही घरी न परतल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी १६ डिसेंबरला रामनगर पोलिसात सौरभ मिसिंग झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवली असता, सौरभचं शेवटचं फोनवर कोणासोबत बोलणं झालं होतं याची माहिती घेतली. यात त्याचा आतेभाऊ अंकित बिरनावर याच्यासोबत ते बोलणे झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अंकितला ताब्यात घेत विचारपूस केली.

यावेळी आरोपी अंकितने सांगितले की, मृत सौरभच्या वडिलांकडून खंडणी मागण्यासाठी त्याचे अपहरण केले होते. मात्र, सौरभने त्याच्या आतेभावाला ओळखल्याने व आरडाओरडा केल्याने हा गुन्हा उघडकीस येईल, या भीतीने अनिकेतने सौरभच्या डोक्यावर बियरच्या बाटलीने वार करत त्याला मारले. मात्र, तरी देखील त्याचा मृत्यू न झाल्याने अंकितने त्याला त्याच्याच गावाजवळील एका नदी पात्राजवळ नेऊन मित्रांच्या मदतीने गळा आवळून त्याची हत्या केली.

दरम्यान, पुरावा नष्ट करण्यासाठी सौरभचा मृतदेह हा मोठ्या दगडाला बांधून नदी पात्रात फेकला. या प्रकरणी पोलिसांनी अंकितला ताब्यात घेत इतर तीन आरोपींना २४ तासात अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Last Updated : Dec 19, 2019, 2:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details