गोंदिया -देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कोटजांभुरा जंगल परिसरात २७ सप्टेंबर रोजी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटली असून हरदोली येथील सोमेश्वर पटले असं मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्या सख्या भावनेचा त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.
सख्खा भाऊच निघाला मारेकरी; अवघ्या २४ तासात ३ आरोपींना अटक - Chichagad police
सख्या भावानेच मित्रांच्या मदतीने सख्या भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. गोंदियाच्या देवरी तालुक्यात घटना घडली असून प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
कोटजांभुरा जंगल परिसरात २७ सप्टेंबर रोजी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला होता. घटनेची गांभीर्याने दखल घेत चिचगड पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपास सुरू केला. दरम्यान अवघ्या २४ तासात ३ आरोपींना सोमेश्वरच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. विशेष म्हणजे सोमेश्वरचा सख्खा भाऊच सोमेश्वरचा मारेकरी निघाला. थमेश्वर उमराज पटले, हसन ईश्वरदास डोंगरे (दोन्ही रा. हरदोली), शैलेश दिनदयाल बागडे (रा. सोनारटोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिन्ही आरोपींनी थमेश्वर पटलेच्या षडयंत्राप्रमाणे सोमेश्वरची हत्या करण्यात आली, अशी कबुली दिली आहे. सध्या तिघांवर हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.