गोंदिया गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीवर नाराज असलेल्या प्रियकराने विष प्राशन करुन स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न Boyfriend suicide attempt by consuming poison in Gondia केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तरुणाने इतक्या टोकाचा निर्णय घ्यायला नको होता अशी भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय या घटनेमुळे त्याची प्रेयसीदेखील भेदरली आहे. एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर प्रियकराने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा dispute with girlfriend boyfriend tried suicide शहरात आहे. प्रियकरावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एव्हरग्रीन हॉटेलमधील ही तिसरी घटनाप्रेयसीवर नाराज झालेल्या एका तरुणाने संतापात टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. या तरुणाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदियातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये संबंधित घटना घडली आहे. विशेष म्हणजे एव्हरग्रीन हॉटेलमध्ये गेल्या आठ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या हॉटेलमध्ये घडत असलेल्या सततच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.