महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात बोलेरो-मोटरसायकलचा अपघात, ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू - gondia bolero-bike acceident

सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ बोलेरो पिकअप आणि दुचाकीमध्ये सकाळी ९ ते १० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३ विद्यार्थांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नीलकंठ कापगते (वय २०), अंकुश माणिक खारकर (वय २२ दोघेही रा. गांगलवाडी, ता. ब्रह्मपूरी, जि. चंद्रपूर), सत्यम आत्माराम बनकर (वय २२ रा. गोगाव, ता. ब्रह्मपूरी, जि. चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.

गोंदियात बोलेरो-मोटरसायकलचा अपघात, ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

By

Published : Oct 27, 2019, 10:25 AM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील बसस्थानका समोर बोलेरो पिकअप आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात झाला. यात 3 विद्यार्थांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तीनही युवक गांगलवाडी तहसील आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील राहणारे आहेत. ते आपल्या दुचाकीने गोंदियाकडे शैक्षणिक कामाकरता जात होते. वाटेतच झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले.

हेही वाचा -वर्ध्यात दिवाळी दिवशीच बहीण भावाचा बुडून मृत्यू; तलावात आढळले मृतदेह

सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ बोलेरो पिकअप आणि दुचाकीमध्ये सकाळी ९ ते १० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३ विद्यार्थांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नीलकंठ कापगते (वय २०), अंकुश माणिक खारकर (वय २२ दोघेही रा. गांगलवाडी, ता. ब्रह्मपूरी, जि. चंद्रपूर), सत्यम आत्माराम बनकर (वय २२ रा. गोगाव, ता. ब्रह्मपूरी, जि. चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा -हिंगोलीतील पावसाने झेंडूवर पाणी फेरले, नुकसानग्रस्तांची भरपाईची मागणी

हे तिघेही मोटारसायकलने गोंदियाकडे येत असताना अचानक मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्यामुळे बोलेरोसोबत समोरासमोर अपघात झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर तीनही युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सडक अर्जुनी रुग्णालयात पाठवण्यात आले. पुढील तपास दुगीपार पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details