गोंदिया- जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील आमगाव तालुक्यातील कुंभार टोला जंगल परिसरात एका अल्पवयीन युवतीचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. युवतीचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून गुन्हेगारांनी तो जळण्याचा प्रयत्न केला ( face burnt young woman found in Gondia ) होता. तरुणीचा चेहरा हा अर्धा जळालेला आहे. मात्र तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणात बोलण्यास नकार दिला आहे.
Half Naked Burnt Woman Body Found : अर्धनग्न चेहरा जळालेल्या अवस्थेत जंगलात सापडला अल्पवयीन युवतीचा मृतदेह - गोंदियात अर्धनग्न चेहरा जळालेल्या अवस्थेत सापडला अल्पवयीन युवतीचा मृतदेह
गोंदिया जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील आमगाव तालुक्यातील कुंभार टोला जंगल परिसरात एका अल्पवयीन युवतीचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. युवतीचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून गुन्हेगारांनी तो जळण्याचा प्रयत्न केला ( face burnt young woman found in Gondia ) होता.
तरुणीचा मृतदेह आढळला -गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोला गावाशेजारी असलेल्या जंगल परिसरात एका अल्पवयीन तरुणीचा बुधवारी मृतदेह आढळला. सकाळी कुंभारटोला येथील काही लोक मोहाची फुले वेचण्यासाठी गेले असतात. जंगल परिसराच्या रस्त्याच्या कडेला त्यांना हा मृतदेह आढळला. याची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणात अद्याप बोलण्यास नकार दिला आहे तसेच याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.