महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गोंदियात भाजपाकडून जोरदार निदर्शने

महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून खंडणीखोर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत गोंदिया येथील भाजप कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. राजीनामा न दिल्यास आणखी आंदोलन तीव्र केल्या जाईल, असा इशाराही भाजपच्यावतीने देण्यात आला आहे.

By

Published : Mar 21, 2021, 2:33 PM IST

Updated : Mar 21, 2021, 3:54 PM IST

गोंदिया

गोंदिया- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केला आहे. गृहमंत्री देशमुख यांच्या 100 कोटी महिन्याची वसूलीच्या निषेधार्थ गोंदिया शहराच्या गांधी प्रतिमा चौकात भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून खंडणीखोर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत गोंदिया येथील भाजप कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. राजीनामा न दिल्यास आणखी आंदोलन तीव्र केल्या जाईल, असा इशाराही भाजपच्यावतीने देण्यात आला आहे.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाकडून जोरदार निदर्शने..


भाजप कार्यालय जवळच पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले -
माजी मुंबई पोलीस आयुक्तांच्या 100 कोटीची मागणीची लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. असेच आंदोलन गोंदिया येथे भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. मात्र, भाजप कार्यालयातून कार्यकर्ते निघाल्यानंतर पोलिसांनी त्यांना तिथेच थांबविले. मात्र, माजी आमदार गोपाल दास अग्रवाल यांनी पुढाकार घेत मोर्चा गोंदिया शहराच्या गांधी प्रतिमा येथे नेऊन गृहमंत्री देशमुख यांच्या100 कोटी महिन्याची वसूलीच्या निषेधार्थ आंदोलन करत गृहमंत्री यांच्या विरोध घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली.

हेही वाचा -गृहमंत्र्यांनी 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा परमबीर सिंग यांचा आरोप; अनिल देशमुखांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

Last Updated : Mar 21, 2021, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details