महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ गोंदियात भाजप महिला मोर्चाचे निदर्शने - BJP Mahila Morcha protest news

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे महिला भाजपच्यावतीने सांगण्यात आले आहे.

BJP Mahila Morcha protest
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

By

Published : Oct 9, 2020, 6:47 PM IST

गोंदिया -राज्यात गेल्या काही दिवसात महिला, तरुणी व बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी आज भाजप महिला मोर्चातर्फे शहरात निदर्शने करून महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागिय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

हेही वाचा -VIDEO : पूरनने झळकावले यंदाच्या आयपीएलचे वेगवान अर्धशतक

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न राज्यात गंभीर झाला आहे. कोरोना केंद्रातही अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या असंवेदनशिल राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आला.

भाजप कार्यालयातून महिला कार्यकर्त्यांनी हातात निषेध नोंदवणारे फलक व झेंडे घेऊन घोषणाबाजी करत उपविभागीय कार्यालय गाठले. यावेळी जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, प्रदेश सचिव संजय पुराम व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी अनिल खडतकर यांना निवेदन सोपवण्यात आले. निवेदन देताना सीता रहांगडाले, शुभांगी मेंढे, सविता पुराम, जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, शालिनी डोंगरे, प्रतिभा परिहार, तामेश्वरी बघेले, कविता रंगारी, नगरसेविका मैथुला बिसेन, अ‍ॅड. हेमलता पतेह, वर्षा खरोले, प्रमिला सिंद्रामे, प्रतिभा भेंडरकर, रिता बागडे, मधू अग्रवाल, प्रीती बन्सोड, अर्चना डोंगरे, उषा निमजे, गोल्डी गावंडे, गुड्डू कारडा, सतीश मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details