महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलींची सरशी; जन्मदर वाढला - मुलींचा जन्म दर गोंदिया

जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खासगी तसेच शासकीय रुग्णालयात एकुण ४१ बालकांचा जन्म झाला. यापैकी,  २२ मुली आहेत तर, १९ मुले आहेत. मुलींच्या जन्माचा हा वाढलेला आकडा वैद्यकीय दृष्टीकोनातून समाधानकारक मानला जात आहे. अदिवासी जिल्ह्यात झालेला हा बदल सकारात्मत असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी व्यक्त करत आहेत.

doc
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 2, 2020, 11:02 PM IST

गोंदिया -मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वाला नाकारणाऱ्या मानसिकतेचा विळखा सैल होऊ लागला आहे. जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खासगी तसेच शासकीय रुग्णालयात एकूण ४१ बालकांचा जन्म झाला. यापैकी, २२ मुली आहेत तर, १९ मुले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलींच्या जन्माचा हा वाढलेला आकडा वैद्यकीय दृष्टीकोनातून समाधानकारक मानला जात आहे.

गोंदिया जिल्ह्यात वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलींनी टाकले मुलांना मागे

हेही वाचा -नक्षलग्रस्त तालुक्यातील मुलींना १५ दिवसांचे मोफत कराटे प्रशिक्षण

मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती गोंदिया जिल्ह्यात कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे या मुलींच्या पालकांनीही मुलगी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. लिंग निदान चाचणीवर बंदी घालण्यात आली आहे. मुलींचा वाढता जन्मदर हा या बंदीचा परिणाम मानला जात आहे. मात्र, त्यासोबतच लोकांच्या मानसिकतेतही बदल होत आहे. दरम्यान, अदिवासी जिल्ह्यात झालेला हा बदल सकारात्मत असल्याचे मत वैद्यकिय अधिकारी व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details