गोंदिया :- गोंदिया शहराला लागून असलेल्या बिर्शी विमानतळासाठी बिर्शी या गावातील लोकांनी आपली शेत जमीन आणि घरे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी दिली होती. त्या जागेचे योग्य भाव मिळेल या आशेने १०६ कुटूंबियांच्या हाती निराशाच पडली आहे. १३ वर्ष झाले तरीही योग्य मोबदला न मिळाल्याने गावकऱ्यांनी बिर्शी विमानतळांच्या १६ एकर जागेवर अतिक्रमण सामूहिक भूमिपूजन केले आहे.
या भूमिपूजनेच्या वेळी पोलीस स्वतः या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र, भूमी पूजन पार पडले असले तरी उद्यापासून गावकरी घरे बांधकाम करायला सुरूवात करणार आहेत. आता तरी जिल्हा प्रशासनच्या भूमिकेकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण
गोंदिया शहराला लागून असलेल्या बिर्शी गावात ब्रिटिशकालीन विमानातळ होता. मात्र स्वातंत्र्यापूर्वी विमानतळाची नासधूस झाल्याने माजी केंद्रीय उड्डाण मंत्री प्रफुल पटेल यांनी २००९ साली सर्व सुविधांनी युक्त अशा विमानतळ बनवला. या विमानतळासाठी बिर्शी गावातील ९७ हेक्टर शेती म्हणजेच ३ लक्ष १८ हजार चौरस फूट जागा विमानतळ प्राधिकरणाने आपल्या ताब्यात घेतली. यासाठी १०६ लोकांनी आपली शेत जमीन व घरे देखील दिली. याला योग्य मोबदला देऊ असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, 13 वर्षानंतरही त्यांच्या पदरी निराशा हाती पडली आहे. त्यांनी २५०० फूट जागा ताब्यात घेत आज भूमिपूजन केले आहे. यात भूमिपूजन सोहळ्यात प्रकल्पग्रस्त बंगाली बांधवही देखील सहभागी झाले होते.
विमानतळ सेवा सुरु