महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे भाजपाचेच वरिष्ठ नेते - अनिल देशमुख गुप्तेश्वर पांडे टीका

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे भाजपाचेच वरिष्ठ नेते असल्याची टीका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. ते गोंदिया येथे बोलत होते.

home minister anil deshmukh
अनिल देशमुख, गृहमंत्री

By

Published : Sep 25, 2020, 2:27 AM IST

गोंदिया- बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे भाजपाचेच वरिष्ठ नेते आहेत. आता त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीवरून ते सिद्ध झाले आहे. बिहार विधानसभेची निवडणूक पाहता भाजपा महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह गृहमंत्री तथा पालकमंत्री अनिल देशमुख हे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अनिल देशमुख, गृहमंत्री

ते म्हणाले, कंगनाबद्दल बोलणार नाही. मात्र, सुशांतसिंह प्रकरणात बिहारचे सेवानिवृत्त झालेले गुप्तेश्वर पांडे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, आधीपासून बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्रर पांडे यांच्या वक्तव्यावरून आधीपासूनच ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असल्याचे दिसून येत होते. आता त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीवरून ते सिद्ध झाले आहे. तसेच बिहार विधानसभेची निवडणूक पाहता महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपा रचत असल्याचा आरोपही यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी केला.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details