महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री बंद; सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने कारवाई - गोंदिया लॉकडाऊन

बाजार समिती सुविधा उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत भाजीपाला विक्री करणार नाही, अशी भूमिका भाजी विक्रेत्यांनी घेतली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री बंद; सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने कारवाई
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री बंद; सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने कारवाई

By

Published : May 3, 2020, 5:12 PM IST

गोंदिया -गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टंसिगचे पालन न केल्याने पोलिसांनी भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केलीय. त्यामुळे संतप्त भाजी विक्रेत्यांनी आजपासून बाजार समितीत भाजी विक्री बंद केली आहे. तसेच याला कृषी उत्पन्न बाजार समितीच जबाबदार असल्याचा आरोपही भाजी विक्रेत्यांनी केला. बाजार समिती सुविधा उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत भाजीपाला विक्री करणार नाही, अशी भूमिका भाजी विक्रेत्यांनी घेतली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री बंद; सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने कारवाई

दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवळे यांनी बाजार समितीला भेट देत पाहणी केली. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने किरकोळ भाजीपाला विक्रीवर बंदी आणून पोलिसांना भाजी विक्रेत्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी मास्क न लावता भाजी विक्री करत असलेल्या तसेच किरकोळ ग्राहकांना भाजी विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली. बाजार समिती सुविधा उलपब्ध करून देत नसल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी यावेळी केला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या लोकांना वारंवार सूचना देऊनही ऐकत नसल्याने ही कारवाई केली असल्याचे मत कृषी उतपन्न बाजार समितीने व्यक्त केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री बंद; सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details