महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांना रानडुकर मारण्याचे अधिकार देण्यात यावे, बळीराजा शेतकरी संघाची मागणी - hiradmala

गोंदिया जिल्हा जंगलाने समृध्द असला तरी जंगलाना लागून असलेल्या शेतात रानडुकरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

संजय टेंभरे -बळीराजा शेतकरी संघ अध्यक्ष

By

Published : Jul 13, 2019, 10:25 PM IST

गोंदिया- हिरडामाला येथे शेतात काम करणा-या तीन मजुरांना ७ जुलै रोजी रानडुकराने जखमी केले. त्यांच्याकडे कुऱ्हाड होती, मात्र गुन्हा दाखल होणार या भीतीने त्यांनी डुकराचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे शेतकऱयांना रानडुकर मारण्याचे अधिकार देण्यात यावे, अन्यथा पीक नुकसान मोबदला प्रती एकर २० हजार देण्यात यावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

संजय टेंभरे -बळीराजा शेतकरी संघ अध्यक्ष

गोंदिया जिल्हा जंगलाने समृध्द असला तरी जंगलाना लागून असलेल्या शेतात रानडुकरामुळे शेतकऱ्यांगोंदिया जिल्हा जंगलाने समृध्द असला तरी जंगलाना लागून असलेल्या शेतात रानडुकरामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होतेचे मोठे नुकसान होते. त्यामुळे जंगलाजवळ असलेल्या शेतकऱयाच्या शेताला शासनाने विनामुल्य ताराचे कुंपन करून द्यावे, जखमींना ५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी यांसह इतर मागणया बळीराजा शेतकरी संघाच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. १५ ऑगस्ट पर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास झाल्यास शेतकरी आपल्या बैलबंडी व ट्रॅक्टरसह शासनाच्या विरोधात निषेध मोर्चा काढुन आंदोलन करतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय टेंभरे यांनी विश्रामभवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details