गोंदिया -जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. गोंदिया येथील मारवाडी शाळेत सखी मतदान केंद्र तयार केले असून त्याची आकर्षक सजावट केली आहे.
गोंदियात महिला सखी मतदान केंद्राचे आकर्षण
गोंदिया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 1282 मतदार केंद्रे असून 10 लाख 96 हजार 441 मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. गोंदिया येथील मारवाडी शाळेत सखी मतदान केंद्र तयार केले असून त्याची आकर्षक सजावट केली आहे.
सखी मतदान केंद्र
गोंदिया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 1282 मतदार केंद्रे आहे. आज 10 लाख 96 हजार 441 मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 5636 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील दोन संवेदनशील मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान होणार आहे.