महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड येथे नाना पटोलेंनी लावली हजेरी - नाना पटोलें यांच्याबद्दल बातमी

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड येथे नाना पटोलेंनी लावली. या वेळी त्यांनी महादेवाचे आणि ख्वाजा उस्मान गणी हारुनी दर्ग्याचे दर्शन घेतले.

Attendance by Nana Patole at Pratapgad, a symbol of Hindu-Muslim unity
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड येथे नाना पटोलेंनी लावली हजेरी

By

Published : Mar 12, 2021, 6:39 PM IST

गोंदिया - प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील महाशिवरात्री यात्रा रद्द करण्यात आल्या असल्या तरी अर्जुनी मोर तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड येथे हजारो भाविकांनी गडावरील भोलेनाथाचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पुर्ण केली. या यात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिली. त्यांनी यावेळी महादेवाचे आणि ख्वाजा उस्मान गणी हारुनी दर्ग्याचे दर्शन घेतले.

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड येथे नाना पटोलेंनी लावली हजेरी

तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड येथे महाशिवरात्रीनिमीत्त व ख्वाजा उस्मान गणी हारुनी उरुसाकरीता दरवर्षी मोठी यात्रा भरते. यावर्षी 11 मार्चला महशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा यावर्षी कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव पहाता प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली. ऐतिहासिक प्रतापगड येथे पाच दिवसापर्यंत महाशिवरात्री व ख्वाजा उस्मान गणी हारुनी उर्सकरीता यात्रा भरते. यात्रेमधे दररोज दोन ते तिन लाख भाविक दर्शनासाठी जिल्ह्यातून व परराज्यातुन भोलेनाथाचे दर्शनाला व दर्ग्यावर चादर चढवून अल्लाचा गजर करतात. यावर्षी प्रशासनाच्या वतीने ही ऐतिहासिक यात्रा सर्व भाविकांच्या आरोग्याचा विचार करता रद्द करण्यात आली आहे. आज प्रतापगड यात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंनी भेट दिली

प्रतापगड हे गाव लॉक डाऊन करण्यात आले असून कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. यात्रेच्या ठिकाणी एकही दुकान लागलेले नाही. चारचाकी व दुचाकी वाहनासाठी पोलिसांतर्फे प्रतिबंध लावण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने कडक प्रतिबंध लावण्यात आले असले तरी हजारो भाविकांनी पाच कि.मी.चा पायी प्रवास करुन गडावर जावून भोलेनाथाचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पुर्ण केली. यात्रेमधे पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना मात्र कुठलेच प्रतिबंध नव्हते हे विशेष. यात्रेच्या ठिकाणी कुठलेही दुकाने नसल्याने पुजेचा सामान घेणाऱ्या भाविकांची तारांबळ उडाली. दरवर्षी प्रमाणे अल्पोपहार नसल्याने सुध्दा भाविकांची कुचंबना झाली. अशा विपरीत परिस्थितीतही हजारो भाविकांनी भोलेनाथाचे दर्शन घेतले.

नाना पटोलेच्या हस्ते गडावर महादेवाची पूजा व दर्ग्यावर चादर चढवली -

ऐतिहासिक प्रतापगड येथे महाशिवरात्री निमीत्त भरणाऱ्या यात्रेचे मोठे स्वरुप निर्माण करणारे व ठिकठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ऐतिहासिक प्रतापगड गडावर जावून महादेव मंदिरात धार्मिकविधी प्रमाणे पूजा केली आणी दर्ग्यावर चादर चढवली.

ABOUT THE AUTHOR

...view details