महाराष्ट्र

maharashtra

भंडारा जळीतकांड प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न - बावनकुळे

By

Published : Feb 19, 2021, 7:32 PM IST

भंडारा जळीतकांड प्रकरणी दोन कंत्राटी नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून, बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा मुख्यमंत्री भंडाऱ्याला आले होते, तेव्हाच हे ठरलं होतं की, छोट्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून, बड्या कर्मचाऱ्यांना वाचवायचे, असा सनसनाटी आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

भंडारा जळीतकांड प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न
भंडारा जळीतकांड प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न

गोंदिया - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ जानेवारीच्या मध्यरात्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून १० नवजात बालकांचा होरपाळून मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. दोषींवर कारवाई करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी सात डॉक्टर व नर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र कोणावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आता तब्बल 39 दिवसांनंतर दोन कंत्राटी नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का? असा सवाल माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, भंडारा जळीतकांड प्रकरणी दोन कंत्राटी नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून, बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा मुख्यमंत्री भंडाऱ्याला आले होते, तेव्हाच हे ठरलं होतं की, छोट्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून, बड्या कर्मचाऱ्यांना वाचवायचे, असा सनसनाटी आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. बावनकुळे हे गोंदियात आज भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंचाच्या सत्कार कार्यक्रमाला आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पटोलेंचे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काल १८ फेब्रुवारीला कॉंग्रेसने संपूर्ण राज्यभर आंदोलन केले. पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात भंडाऱ्यात देखील आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ट्विटरवरून नेहमी टिवटिव करणारे आता पेट्रोल दरवाढीवर का बोलत नाहीत. इंधन दरवाढीवर अभिनेते का बोलत नाहीत. आम्ही अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे राज्यातील शुटिंग बंद पाडू, व एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. दरम्यान नाना पटोले यांच्या या वक्तव्याला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भंडारा जळीतकांड प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न

24 फेब्रुवारीला जेलभरो आंदोलन

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या कापण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, भाजप यावर आवाज उठवल्याशिवाय शांत बसणार नाही. येत्या 24 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात भाजपच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details