गोंदिया - शहरातील गजबजलेल्या गुरुनानक वार्डात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या बाजूला असलेले एटीएम चोरट्यांनी आज पहाटे फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान बँकेचे कर्मचारी बँकेत आले असता तर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याची माहिती बँक व्यवस्थापक व अधिकाऱ्यांना देण्यात आली.
पंजाब नँशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा गोंदियात प्रयत्न - गोंदियात एटीएम लुटण्याचा प्रयत्न
गोंदिया शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वीही हे एटीएम फोडण्याचा दोनदा प्रयत्न झाला होता. त्यामुळे शहरातील एटीएमची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
याप्रकरणी बँकेने गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तपास कामात सीसीटीव्ही फुटेजचा खूप उपयोग होऊ शकतो. या आधारे आरोपीचा शोध घेण्यात मदत मिळेल. यापूर्वीही पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम २००८ व २००९मध्ये दोनद फोडण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र तेव्हाही चोरट्यांना यश आले नव्हते. त्या प्रकरणात पोलिसांनी एटीएममध्ये लागलेल्या कॅमेऱ्याच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटकही करण्यात आले होते. मात्र पुन्हा १० वर्षानंतर गजबजलेल्या गुरुनानक वॉर्डात पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याची ही तिसरी घटना घडली आहे. त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील असे अनेक एटीएम आहेत, ज्यामध्ये कोणतीही सुरक्षारक्षक नसतात. अशा एटीएमची सुरक्षा फक्त सीसीटीव्हीच्या भरोसे आहे.