महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Plaintiff Threw Slippers On Jugde : सुनावणी सुरु असतानाच फिर्यादीने भर न्यायालयात भिरकावली न्यायाधीशांकडे चप्पल - फिर्यादीने न्यायाधीशावर चप्पल भिरकावली

गोंदियात भर न्यायालयात ( Gondia District Court ) न्यायाधीशांकडे चप्पल भिरकावण्यात आली ( Plaintiff Threw Slippers On Jugde ) आहे. सुनावणी सुरु असतानाच हा प्रकार घडला. पोलिसांनी चप्पल भिरकावणाऱ्याला अटक केली ( Plaintiff Arrested For Throwing Slippers On Judge ) आहे.

गोंदिया जिल्हा न्यायालय
गोंदिया जिल्हा न्यायालय

By

Published : Feb 5, 2022, 10:31 PM IST

गोंदिया : न्यायालयीन खटल्यात आरोपींनी न्यायाधिशांवर भौतिक वस्तू भिरकावल्याच्या अनेक घटना घडल्या ( Plaintiff Threw Slippers On Jugde ) आहेत. मात्र, आज 5 फेब्रुवारी रोजी गोंदिया येथील न्यायालयात न्याय मागणार्‍या फिर्यादीने चक्क न्यायाधीशावर चप्पल भिरकावल्याची घटना दुपारच्या वेळी जिल्हा न्यायालयात ( Gondia District Court ) घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे. रवी शंकर काकडे (47 रा. सूर्याटोला) असे आरोपीचे नाव आहे.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, आजघडीला आरोपी झालेला व चप्पल भिरकावण्यापूर्वी तक्रारकर्ता असलेल्या रवी काकडे यांनी चार वर्षापूर्वी एका शिक्षकाला 4 लाख रुपये उसणवार दिले होते. त्यावेळेस त्या शिक्षकाने रक्कमेचा परतावा म्हणून 4 लाख रुपयांचा धनादेश रवी काकडे यांना दिला. रवी काकडे यांनी तो धनादेश वटविण्यासाठी बँकेत दिला असता तो वटला नाही. यासंदर्भात रवी काकडे यांनी जिल्हा न्यायालयाच्या पाचव्या सहदिवाशी न्यायाधीश, क स्तरकडे याचिका न्यायप्रविष्ठ आहे. चार वर्षापासून याप्रकरणी सुनावणी सुरु होती. यातंर्गत आज, 5 फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावनी सुरु असताना रवी काकडे यांने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली. मात्र, या घटनेमुळे न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर रवी काकड़े याला पोलिसांनी अटक केली ( Plaintiff Arrested For Throwing Slippers On Judge ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details