महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य राखीव पोलीस दलातील लाचखोर सहायक फौजदार 'एसीबी'च्या जाळ्यात - Omprakaesh Sapate

राज्य राखीव पोलीस गट क्रं. १ पुणे येथील शिपायाला लाच मागितल्याप्रकरणी सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले आहे.

लाचखोर सहायक फौजदार प्रभाकरअंडागडे

By

Published : Jul 4, 2019, 3:08 PM IST

गोंदीया - राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १ पुणे येथील शिपायाला ५०० रूपयांची लाच मागणाऱ्या सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई आज गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

राज्य राखीव पोलीस दलातील लाचखोर सहायक फौजदार 'एसीबी'च्या जाळ्यात


प्रभाकर अनंत अंडागडे असे लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. २२ जुनला पुणे येथील राज्य राखीव दल गट क्रमाक १ ची तुकडी गोंदियाच्या नक्षलग्रस्त भागात आली आहे. या तुकडीचे कमांडो प्रशिक्षण पोलीस मुख्यालय गोंदिया येथे सुरू आहे. प्रशिक्षणादरम्यान अंडागडे याने २७ जुन रोजी कंपनीच्या ४० कर्मचाऱ्यांना सांगितले की, गोंदिया जिल्ह्यात आपली ड्युटी लागल्यामुळे वेतनामध्ये प्रोत्साहान भत्याचा फायदा होतो आणि सुटीवर जाणे-येणे सोईस्कर होते. यामुळे विकास पाटील यांनी प्रयत्न करून आपल्या कंपनीची ड्युटी गोंदिया जिल्ह्यात लावून घेतली आहे. त्यामुळे आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून २० हजार रूपये गोळा करून तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना पाठवायचे आहे, असे सांगून प्रत्येकांकडून ५०० रूपयांची लाच मागण्यात आली होती. परंतु एका शिपायाला ५०० रूपये देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे त्याने २९ जुनला अंडागडे यांच्याविरूध्द तक्रार दिली होती. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सहायक फौजदाराला अटक करण्यात केली आहे. अंडागडे यांच्या विरोधात गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details