गोंदिया - जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव जंगल शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मुद्देमालासह तीन आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सात आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अर्जुनी-मोरगावात कोंबडा बाजारावर छापा, तीन आरोपींना अटक - गोंदिया लेटेस्ट न्यूज
मोरगाव जंगल शिवारात पैज लावून कोंबडा बाजार भरविला जात असल्याची गुप्त माहिती अर्जुनी-मोरगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना सापळा रचून या कोंबडा बाजारावर छापा टाकला. यावेळी ५ हजार १५० रुपये रोख, चार कोंबड्या, अडीच हजार रुपये किमतीचे पाच लोखंडी काते, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोरगाव जंगल शिवारात पैज लावून कोंबडा बाजार भरविला जात असल्याची गुप्त माहिती अर्जुनी-मोरगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना सापळा रचून या कोंबडा बाजारावर छापा टाकला. यावेळी ५ हजार १५० रुपये रोख, चार कोंबड्या, अडीच हजार रुपये किमतीचे पाच लोखंडी काते, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वामन नथु येरने (४० वर्ष, रा. इटखेडा), लीलाधर आसाराम मडावी (२५, पा, अर्जुनी मोरगाव), सुनील केवळराम वलके (४२, मोरगाव) या आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सात आरोप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करत आहेत.