महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंगणवाडी सेविकेवर जडला वृद्धाचा जीव, तिने विरोध करताच डोक्यात घातली काठी - आंबेतलाव गाव

मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेची गावातील छगनलाल तुरकर या व्यक्तीने डोक्यात काठी मारुन हत्या केली आहे.

आरोपी आणि त्याचे पत्र

By

Published : Apr 24, 2019, 8:34 PM IST

Updated : Apr 24, 2019, 10:15 PM IST

गोंदिया - मोहफूल वेचण्याकरता गेलेल्या डिलेश्वरी बघेले या अंगणवाडी सेविकेचा गावातील छगनलाल तुरकर (६४) या व्यक्तीने डोक्यात काठी मारुन हत्या केली आहे. आरोपीने या घटनेनंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव गावात ही घटना घडली.

घटनेबाबत माहिती देताना नागरिक

बघेले हे अंगणवाडीचे काम आटोपून दररोज प्रमाणे शेतात मोहफूल वेचण्याकरता गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या घराच्या शेजारी राहणारा छगनलाल तुरकर (६४) हा त्यांचा पाठलाग करत शेतात आला. त्याने काठीने हल्ला करून बघेले यांची हत्या केली. यानंतर या आरोपीने काही अंतरावर जाऊन विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांना हा आरोपी बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर त्याला गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी त्याच्या विरोधात ३०२ चा गुन्हा नोंद केला आहे. आरोपीने विष खाण्याअगोदर एका कागदावर 'मैं अभी नही बचूगा, मैं जहर खा लिया हू', असे लिहलेला कागद त्याच्याजवळ सापडला.

डिलेश्वरीच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. तसेच मुलीचे लग्न झाले असून मुलगा नागपूर येथे एका कंपनीत काम करत आहे. डिलेश्वरी गावातीलच अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीस म्हणून कार्यरत होती. आरोपी हा गावातीलच असून त्याची डिलेश्वरींवर वाईट नजर होती, अशी माहिती समोर येत आहे. आरोपीने महिलेशी असभ्य वागणूक करण्याचा प्रयत्न केला असावा आणि महिलेने याचा विरोध केल्यामुळे त्याने महिलेची हत्या केली असावी, असे बोलले जात आहे.

Last Updated : Apr 24, 2019, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details