गोंदिया -दारुबाबत घरझडती घेण्यासाठी आपल्या अंमलदारसह गेलेल्या, महिला पोलीस उपनिरीक्षक राधा काशीनाथ लाटे यांना एका दारू विक्रेत्या कुटुंबातील तिघांनी संगनमत करून काठीने मारहाण केली. व शिवीगाळ देवून खोटे आरोप लावून फसवून टाकण्याची धमकी दिली. ही घटना तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रविदास वॉर्डात घडली. आरोपींमध्ये सूरज प्रकाश बरियेकर, पत्नी प्रिया सुरज बरियेकर व आई माया बरियेकर (रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा) यांचा समावेश आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करून काठीने मारहाण-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे या आपल्या पथकासह कायदेशीर रित्या दारुबाबत घरझडती घेण्यासाठी आरोपी सूरज यांच्या घरी गेल्या होत्या. शासकीय काम करीत असताना आरोपीच्या अवैध धंद्यावर कारवाई होवू नये, याकरिता आरोपीने आपली पत्नी प्रिया सुरज बरियेकर व आई माया बरियेकर यांना बोलावून महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे यांना धक्काबुक्की करून काठीने मारले. तसेच शिवीगाळ देवून फसविण्याची धमकी दिली.
6 लाख 44 हजार 750 रुपये किंमतीचा माल जप्त-