गोंदिया - जिल्ह्यातून तब्ब्ल १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गोंदियाच्या बिर्शी विमानतळावरून ( Airplane flights from Gondia ) पहिल्यांदाच प्रवासी विमान वाहतुकीचे पहिले टेक ऑफ १३ मार्च २०२२ पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी ( MP Sunil Mendhe ) दिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल ( Praful Patel efforts for airport ) यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यात विमानतळ तयार करण्यात आले होते. मात्र, प्रदीर्घ कालावधीनंतर याचा लाभ गोंदिया जिल्ह्यासह बाजूला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील नागरिकांना होणार आहे. गोंदिया ते इंदूर-हेैदराबाद ( Gondia Hyderabad plane service ) अशी ही विमान वाहतूक सेवा सुरू होणार आहे. गोंदिया बिर्शी विमानतळ हे ब्रिटिश कालीन विमानतळ आहे. या ठिकाणी कार्गोसारखे विमान उतरू शकतात. कारण या ठिकाणी महाराष्ट्रासारखी कुठेही इतकी मोठी हवाई पट्टी नाही. मात्र, या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली नाही.
केवळ 2 हजार रुपयांचे विमान तिकीट हेही वाचा-Russia Ukraine Crisis : युक्रेनचा रशियापुढे लागणार का टिकाव? जाणून घ्या दोन्ही देशांकडील सैन्यदलाचे सामर्थ्य
गोंदिया ते इंदूर विमान वाहतूक
मागील दोन वर्षांपासून या विमानतळावरून हवाई सेवा सुरू व्हावी, यासाठी गोंदिया-भंडाराचे खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय उडाण मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा केला. नागरी वाहतूक मंत्रालयाने मंत्री व अधिकारी यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार केले. यानंतर त्यांनी प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला तसे निर्देश दिले होते. नोयडा येथील फ्लाय बिग या खासगी कंपनीने गोंदिया ते इंदूर अशी वाहतूक सेवा सुरू करण्याचे कंत्राट घेतले आहे. बिर्शी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यातील सर्व अडचणीसुद्धा दूर झाल्या आहेत.
हेही वाचा-Russia-Ukraine crisis live updates : युक्रेनची राजधानी किवीवमध्ये भारतीयांसाठी 24 तास मदतकार्य सुरू - राजदूत पार्थ सत्पथी
गोंदिया ते पुणे गोंदिया ते मुंबई विमान वाहतूक
येत्या १३ मार्च २०२२ ला बिर्शी विमानतळावरून पहिले प्रवासी विमान टेक ऑफ आणि लँडिग करणार आहे. १ मार्च २०२२ पासून तिकीट विक्रीकरितादेखील ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजने अंतर्गत ही विमान वाहतुक सेवा सुरू करण्यात येत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री जोतिरादित्य सिंधिया इंदूर येथून येत्या १३ मार्चला विमान सेवेचे उद्घाटन करणार आहेत. यापुढे गोंदिया ते पुणे गोंदिया ते मुंबई अशी ही विमान वाहातूक सेवा सुरू होणार आहे.
हेही वाचा-BJP Allegation On BEST : मलिदा मिळण्यासाठी बेस्टने राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीवरही पाणी सोडले : सुनिल गणाचार्य
केवळ 2 हजार रुपयांचे विमान तिकीट
प्रवाशांची संख्या कमी असलेल्या विमानतळावरून प्रवाशांना कमी दरात (2000-2200 रुपये) विमान तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारची उड्डाण नावाची योजना आहे. त्याचा लाभदेखील या विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे गोंदिया-इंदौर-हैद्राबाद केवळ दोन हजार रुपये तिकीट असणार आहे. विमानतळावरील आरक्षण खिडकी आणि इतर सुविधांची पूर्तता झाल्यास येत्या १३ मार्च पासुन प्रवासी सेवा सुरू होणार असल्याची माहीती खासदार सुनिल मेंढे यांनी दिली.
विमानतळावरील सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांच्या हाती
हेही वाचा-राज्यात रस्ते अपघातात घट, पण मृत्यूची संख्या वाढली
येत्या १३ मार्चपासून सुरू असलेल्या विमान सेवेसाठी या विमानतळावर प्रवासी वाहतुक सेवा सुरू होणार आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी महाराष्ट्र पोलिसांचीच सेवा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या तपासणीपासून साहित्य स्क्रिनीगंपर्यतचे सर्व कार्य महाराष्ट्र पोलीस करणार आहेत.