गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील वडेगाव येथील लक्ष्मीबाई हनुमय्या सिल्लेवार या 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर वृद्धा महिला ही एकटीच राहत होती.
गोंदियात वयोवृद्ध महिलेचा गळा आवळून खून - gondia crime news
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील वडेगाव येथील लक्ष्मीबाई हनुमय्या सिल्लेवार या 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला आहे.
गोंदिया
तसेच वृद्ध महिलेचा खून करून महिलेच्या घरातील अडीच लाखांच्या दागिन्यांवर आरोपीने डल्ला मारला आहे. याची माहिती परिसरातील लोकांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तेथील पंचनामा केला आहे. वृद्ध महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले करत आहेत.