गोंदिया -जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडत होते. त्यामुळे वातावरणातही बदल झाला होता. नागरिकांना या वातावरणामुळे उन्हाळ्याच्या दिवसा सारखे वाटत होते. नागरिकांना पाऊस कधी पडणार याची प्रतीक्षा लागून राहिली होती. मात्र, मंगळवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्गही या पावसामुळे सुखावला आहे. तसेच हवामान खात्याने जिल्ह्यात दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मोठ्या विश्रांतीनंतर गोंदियात पावसाची पुन्हा हजेरी; अतिवृष्टीचाही इशारा - अतिवृष्टीचा ही इशारा
मंगळवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्ग ही या पावसामुळे सुखावला आहे. तसेच हवामान खात्याने जिल्ह्यात दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असून अतिवृष्टीचाही इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला जलाशयाचे २ गेट १ फुटाने उघडण्यात आले आहेत. या पुजारीटोला जलाशयाचे गेट उघडल्याने सालेकसा आणि आमगाव तालुक्यातून वाहणाऱ्या वाघ नदीत सोडलेले पाणी दहा तासात पोहोचणार आहे. पहाटे ४ वाजेपर्यंत हे पाणी पोहचणार असून नदी काठाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. गोंदिया जिल्ह्यात पुढच्या २४ तासात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने जिल्ह्यातील वाघ नदी आणि वैनगंगा नदी काठावर नागरिकांनी जाणे टाळावे. तसेच दुसऱ्याही नदी नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती विभागाने केले आहे.