गोंदिया -कोरोना रुग्णावर अनधिकृतपणे उपचार केल्या प्रकरणी गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथील नायरा हॉस्पिटल चालकावर गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.
गोंदियात अवैधरित्या कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई - नायरा हॉस्पिटल
स्थानिक प्रशासनाला कोणतीही माहिती न देता कोविड हॉस्पिटल चालविणे व हॉस्पिटलचा जैविक कचरा इतरत्र फेकणे, या कारणाने नायरा हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गोरेगाव येथील नायरा हॉस्पिटलमध्ये अनधिकृतपणे कोरोना रुग्णावर उपचार सुरु आहे. या हॉस्पिटलमधील जैविक कचऱ्याची विल्हेवाट न लावता हॉस्पिटलच्या परिसरात हा कचरा फेकण्यात येत असल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाला केली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी नायरा हॉस्पिटलचा दौरा केल्यानंतर या हॉस्पिटलमध्ये 14 कोरोना रुग्णावर उपचार सुरू होते. स्थानिक प्रशासनाला कोणतीही माहिती न देता कोविड हॉस्पिटल चालविने व हॉस्पिटलचा जैविक कचरा इतरत्र फेकणे, या कारणाने नायरा हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंड न भरल्याने गोरेगाव नगर पंचायतमधील प्रशासकीय अधिकारी आशुतोष कांबळे यांच्या तक्रारीनुसार गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहे.
हेही वाचा -सावळागोंधळ! पश्चिम बंगालमध्ये मृत घोषित केलेला रुग्ण निघाला जिवंत