महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर अ‌ॅसिड हल्ला; आरोपी फरार

खलबंधा गावात राहाणारी आचाल कळनबे ही नागपूरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सुट्ट्या घेऊन काही दिवसाअगोदर ती गावी आली होती. ती नागपूरला जाण्यासाठी खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली असता हा प्रकार घडला.

acid-attack-on-22-year-old-girl-in-gondia
गोंदियात २२ वर्षीय तरुणीवर अ‌ॅसिड हल्ला

By

Published : Dec 18, 2019, 7:57 PM IST

गोंदिया- येथील खळबंधा गावात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर दोन अज्ञात तरूणांनी अ‌ॅसिड हल्ला केला. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती बिघडत असल्याने तिला नागपूर येथे पाठविण्यात आले.

गोंदियात २२ वर्षीय तरुणीवर अ‌ॅसिड हल्ला

हेही वाचा-नागरिकत्व विधेयकावरुन विधानसभेत पुन्हा गदारोळ; सुधीर मुनगंटीवार आक्रमक

खलबंधा गावात राहाणारी आचाल कळनबे ही नागपूरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सुट्ट्या घेऊन काही दिवसाअगोदर ती गावी आली होती. ती नागपूरला जाण्यासाठी खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली. दरम्यान, दोन अज्ञात तरुण दुचाकीवर आले. त्यांनी तोंडाला कापड बांधले होते. त्यांनी आचालवर अ‌ॅसिड टाकत पळ काढला. गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना देऊन मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, आचलची प्रकृती बिघडत चालल्याने तिला पुढील उपचाराकरिता नागपूरला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details