गोंदिया- गोंदियातील एका विधवा महिलेशी मध्यप्रदेशातील एका व्यक्तीने फेसबूकवर मैत्री करून आधी लैगिक शोषण केले. त्यानंतर तिच्याशी लग्न करून तिच्याकडून 1 लाख 99 हजार रुपये घेत पळ काढला. पीडितने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करताच गोंदिया पोलिसांनी आरोपी दिलीप यादव (वय 39 वर्षे) याला पुण्यातून अटक केली आहे.
आरोपी दिलीप लक्ष्मण यादव (रा. जवाहरगंज चिडिया मैदान रोड नंबर 44 रेल्वे स्टेशनजवळ खंडोबा मध्य प्रदेश), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात नोकरी करतो. त्याला समर्थ हाउसिंग सोसायटी एकता चौक वॉर्ड नंबर 12 गणपती मंदिरजवळ रूपीनगर तळवडे चिखली बुद्रुक पुणे येथून अटक करण्यात आली आहे. 39 वर्षीय दिलीप यादव या व्यक्तीने कोरोना काळात गोंदिया शहरात राहणाऱ्या एका विधवा महिलेशी फेसबूकवर मैत्री केली. त्यानंतर दिलीप यादवने त्या महिलेशी 27 जुलै, 2020 ते 1 जून, 2021 या काळात गोंदियातील विविध हॉटेल, लॉजला नेत तिच्याशी शारीरिक सबंध देखील प्रस्थपित केले.