गोंदिया - गोरेगाव तालुक्यतील वनविभागातंर्गत येत असलेल्या लेंडेझरी येथे घोरपडीची शिकार करणार्या एका आरोपीला वन विभागाने अटक केली आहे. कारवाईत आरोपीच्या घरातून घोरपडीचे शिजवलेले मांंस हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीला 7 जूनला तालुक्यातील कुऱ्हाडी येथून अटक करण्यात आली आहे.
घोरपडीची शिकार करणारा आरोपी वनविभागाच्या जाळ्यात - लेंडेझरी
लेंडेझरी येथील रहिवासी राजू ऊंदरु लामकासे याने घोरपडीची शिकार करुन मांस शिजवल्याची माहिती गोरेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एल. साठवने यांना गुप्तहेराकंडून मिळली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लेंडेझरी येथील रहिवासी राजू ऊंदरु लामकासे याने घोरपडीची शिकार करुन मांस शिजवल्याची माहिती गोरेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एल. साठवने यांना गुप्तहेराकंडून मिळली. त्यानुसार क्षेत्र सहाय्यक कोहाट, वनरक्षक एसबी फलरे व वनमजुरांना सोबत घेत सायकांळी 6 वाजण्याच्या सुमारास राजू लामकासेच्या घरावर छापा मारण्यात आला.
दरम्यान, या कारवाईत घोरपडीचे शिजवलेले मटण मिळाले. मात्र, आरोपी फरार झाला होता. दुसऱ्या दिवशी वनविभागाच्या चमूने आरोपीला कुऱ्हाडी या गावातून अटक करुन वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.