गोंदिया - तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे १९ फेब्रुवारीला ट्रॅक्टरने मातीची वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराला तलाठी देवेंद्र टोलीराम नेवारे यांनी पकडले होते. तक्रारदाराने तलाठी देवेंद्र नेवारे यांना ट्रॅक्टर सोडण्याबाबत विनंती केली. मात्र, तलाठी यांनी तक्रारदाराच्या ट्रॅक्टरवर वर्षभर कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
गोंदियात तीन हजाराची लाच घेताना तलाठ्यास अटक - गोंदिया
तक्रारदाराच्या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली. आरोपी देवेंद्र नेवारे यांनी तक्रारदाराकडून ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी उर्वरित ८ हजारांची मागणी केली. त्याचा पहिला हप्ता म्हणून ३ हजार रुपये लाच घेत असताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात अटक केली.
तक्रारदाराने देवेंद्र नेवारे यांना नाईलाजाने २ हजार रूपये दिले व उर्वरित ८ हजार रूपये नंतर आणून देतो असे सांगितले. मात्र २० फेब्रुवारीला तलाठी यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन उर्वरित ८ हजाराची मागणी केली. मात्र, तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने गोंदियातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तलाठ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली. आरोपी देवेंद्र नेवारे यांनी तक्रारदाराकडून ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी उर्वरित ८ हजारांची मागणी केली. त्याचा पहिला हप्ता म्हणून ३ हजार रूपये लाच घेत असताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात अटक केली. आरोपीविरुद्ध गंगाझरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.