गोंदिया- जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना 50 हजारांची लाच घेताना गोंदिया लाचलुचपत विभागाने आज (बुधवार) सकाळी त्यांच्या राहत्या घरी अटक केली. एसीबीच्या या कारवाईने महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
गोंदियात गटविकास अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना अटक हेही वाचा -गोंदियात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न
तक्रारदार हे तिरोडा पंचायत समिती येथे ग्रामीण गृह निर्माण अभियंता कंत्राटी या पदावर कार्यरत होते. त्यांचे पूर्वीचे मानधन 1 लाख रुपये काढून देण्यासाठी तसेच 5 वर्षासाठी पदाचा कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदारांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया लाच लुचपत विभाग गाठत तक्रार नोंदवली. संपूर्ण तक्रार आणि त्यांची शहानिशा केल्यानंतर आज गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेड यांना त्यांच्या घरी पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे लाच लुचपत अधिनियम 1988 (सुधारित 2018)कलम 7 नुसार कारवाई सुरु आहे.
हेही वाचा -गोंदिया ते जम्मू-काश्मीर व्हाया वाघा बॉर्डर, पर्यावरणाचा संदेश देत युवकांची सायकलयात्रा
एका वर्ग 1 च्या अधिकाऱ्याला अटक केल्याने महसूल अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यात विशेष बाब अशी की, काही महिन्यापूर्वी तिरोडा तहसीलदारांनासुद्धा लाच घेताना अटक झाली होती.