गोंदिया- रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गाडीतून पोलिसांना बघून पळ काढणार्या आरोपीस अटक करण्यात आली. तसेच त्याच्या जवळून 6 मोबाईल व 1 धारदार चाकू, असा 43 हजार 200 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्या अट्टल मोबाईल चोरास अटक न्यायालयात हजर केले. बुधवारी (25 ऑगस्ट) करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की, प्रवासी शिशुपाल भरतलाल बर्वे (वय 23 वर्षे, रा. भांकरपूर, गली नं.1, ता. राजनांदगाव, जि. दुर्ग, राज्य छत्तीसगड) हे 24 ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेसने रक्षा बंधनानिमित्त राजनांदगाव ते गोंदिया असा प्रवास करत होते. ते रेल्वेच्या समोरील जनरल बोगीत बसले होते. गाडी 12.30 वाजता गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर पोहोचली. गाडीतून उतरताना प्रवाशांच्या गर्दीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांचा 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरला. त्यांच्या तक्रारीवरून गोंदिया रेल्वे पोलिसांनी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे करत होते. बुधवारी खबऱ्याच्या माहितीनुसार आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी एक संशयित व्यक्ती गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात दिसून आला. पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात गस्त घातली होती. ये-जा करणार्या गाड्यांकडे ते लक्ष ठेवून होते. सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास गीतांजली एक्सप्रेस (02260) फलाट क्र. 3 वर थांबली. त्या गाडीत पोलीस गस्त घालताना एक व्यक्ती त्यांना बघून गाडीच्या समोरील डब्यात उडी मारून आऊटर रेल्वे ट्रॅक साईडला पळू लागला. त्यामुळे पोलीस पथकाने त्याला घेराव घालून पकडले. त्याला पळून जाण्याचे कारण व नाव-पत्ता विचारण्यात आले. त्याने हर्ष राजेश बंसोड (वय 22 वर्षे, रा. भांकरनगर, वॉर्ड-13, ता.जि.दुर्ग राज्य छत्तीसगड), असे सांगितले. तसेच गाडीमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचेही त्याने सांगितले.
चोराकडून 6 मोबाईल व 1 धारदार चाकू जप्त