महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! बापानेच केला गतीमंद मुलीवर अत्याचार - crime news

नराधम बापाने स्वतःच्या गतीमंद मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तहसील अंतर्गत येयणाऱ्या घोटी गावात घडली आहे. नराधम बापाने पळ काढला असून त्याचा शोध सुरू आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jul 12, 2020, 4:05 AM IST

गोंदिया - नराधम बापानेच स्वतःच्या गतीमंद मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याची घटना जिल्ह्यातील गोरेगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या घोटी गावात घडली आहे.

याबाबात गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम हा अंबाटोली परिसरातील एका मिलमध्ये हमालीचे काम करतो. तो गुरुवारी (दि. 8 जुलै) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कामावरुन घरी आला. घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने गतीमंद मुलीवर अत्याचार केला. दरम्यान पीडित मुलीची आई व नराधमाची पत्नी त्या ठिकाणी पोहोचली व पतीला फटकारले. त्यावेळी ओरडणे बंद कर नाही ठार मारीन, अशी धमकी देत घटनास्थळावरुन पळ काढला.

मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल दाखल केला आहे. नराधमाचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी

ABOUT THE AUTHOR

...view details