गोंदिया - शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्लात मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात पिंडकेपार जंगल परिसरात घडली. पूना मोहन मेश्राम (वय 60) असे मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. या घटनेनंतर वाघाला जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे. गोरेगाव तालुक्यातील भडंगा येथील रहीवाशी पूना मोहन मेश्राम हे भडंगा ते रेल्वे स्टेशनच्या पिंडकेपार जंगल परीसरात आपल्या शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते.
वाघाच्या हल्लात 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यु, गोंदिया जिल्ह्यातील घटना - A 60-year-old man was killed in a tiger attack
शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्लात मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात पिंडकेपार जंगल परिसरात घडली. पूना मोहन मेश्राम (वय 60) असे मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.
वाघाणे अचानक हल्ला केला
चाऱ्याच्या शोधात असताना जंगलाच्या आतिल भागात पोहचला. दरम्यान, चारा जमा करत असताना अचानक वाघाणे त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यु झाला. जंगलातून एकच आरडाओरड एकू आल्याने, गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन जंगलाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत वाघाच्या हल्लात पूना मेश्राम यांचा मृत्यु झाला होता. यावेळी जंगलात बघ्याची एकच गर्दी झाली होती. या घटनेची माहिती गोरेगाव वनविभागाला देण्यात आली असून, घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व पोलीस दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी मृत पूना मेश्राम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.